महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत बालदिनानिमित्त मिष्ठान्न वाटप

दिंडोरी । प्रतिनिधी :-दिंडोरी येथील श्री ईशान्येश्‍वर विद्यानिकेतन हायस्कूल व ज्यूपिटर इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती, बालदिन, क्रांतीवीर लहुजी साळवे जयंतीनिमित्त नाशिक येथील सेवाभावी कौशल्य फांऊडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. 
      प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरु, क्रांतीवीर लहुजी साळवे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना नाशिक येथील सेवाभावी कौशल्य फांऊडेशनचे अध्यक्ष नीलेश खरे, उपाध्यक्ष अजित पगारे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मनोज पाटील यांनी मिष्ठान्न वाटप केले. याप्रसंगी नीलेश खरे, अजित पगारे यांनी सांगितले की, आजचे मुले हे उद्याचे भविष्य असतात. याप्रमाणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, असे ते म्हणाले. प्राचार्य श्रुतिका कराटे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन व बालदिन याविषयी माहिती दिली. शाळेचे विद्यार्थी हर्षद शेवरे, प्रकाश खरे यांनीही चाचा नेहरू यांची वेशभूषा परिधान करून भाषण दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य श्रुतिका कराटे यांनी केले तर आभार पूजा परदेशी यांनी मानले. याप्रसंगी शिक्षकवंृंद, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने