दिंडोरी l प्रतिनिधी :-संपूर्ण राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, राज्यभरातून हजारो भाविक केंद्रात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झाले होते, यावेळी गुरू माऊली अण्णासाहेब मोरे यांचे हितगुज झाले, हितगुज ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते, यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला,तसेच दिंडोरी तालुक्यातील नळवाडी येथील दत्त मंदिरातही दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, परिसरातील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती,
दिंडोरी तालुक्यातील करंजी येथील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, दत्तात्रय प्रभुंचे आजोळ म्हणून करंजी देवस्थान पंचक्रोशीतील प्रसिद्ध आहे, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या करंजी येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात, राज्यभरातील भाविक येथे प्रभु दत्तात्रयांच्या दर्शनासाठी येत असतात, दत्त जयंती निमित्त हजारो भाविकांनी प्रभु दत्तात्रेयांचे दर्शन घेतले, यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला,