दिंडोरी l प्रतिनिधी : - दि ११ नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार निधीतून दिंडोरी तालुक्यातील 17 शाळांना संगणक व पोडियमचे वितरण कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्रीराम शेटे म्हणाले की, आमदार सत्यजित तांबे हे अभ्यासू आमदार असून शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल घडत असताना शाळांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी संगणक व पोडियम वितरणाचा उपक्रम कौतुकास्पद असून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील दिंडोरी तालुक्यावर विशेष प्रेम दाखवून तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांसाठी तांबे परिवाराने योगदान दिले असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन डॉ. योगेश गोसावी यांनी केले. नानासाहेब कोल्हे संगमनेर यांनी सर्वांचे स्वागत केले. व्यासपीठावर सोनजांबचे सरपंच प्रभाकर जाधव, लक्ष्मण देशमुख, कादवा संचालक मधुकर गटकळ, पराग भगरे, छबुराव मटाले,सचिन वडजे, तुकाराम जाधव, रघुनाथ जाधव, पालखेड सरपंच शालिग्राम गायकवाड, पत्रकार बापू चव्हाण, रावसाहेब जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डॉ.प्रदीप तिडके, जनार्दन उगले, रामदास मातेरे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार सचिन वडजे यांनी मानले.
संगणक व पोडियम प्राप्त दिंडोरी तालुक्यातील शाळा - शामलाताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वारे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोचरगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय, मोहाडी, ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, अंबानेर (अन बेगन):, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनजांब , न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड बंधारा, जिल्हा परिषद शाळा पालखेड बंधारा जिल्हा परिषद शाळा कोशिंबे, के. आर.टी हायस्कूल, कोराटे,वीरभद्र विद्यालय, कोशिंबे,अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, भनवड, गुरुकुल उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, करंजी, जनता माध्यमिक विद्यालय, लोखंडेवाडी, ऋषीलँड माध्यमिक विद्यालय,करंजी: