महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक एड्स दिन साजरा

दिंडोरी l प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी येथील महाविद्यालयात बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिन कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षते खाली पार पडला प्रमुख वक्ते श्रीमती सुरेखा पांगरे , समुपदेशक ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी व श्री प्रमोद भालेराव तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी हे होते. श्रीमती सुरेखा पांगरे मॅडमनी आपल्या भाषणात एड्स म्हणजे काय ते सांगून एड्स ची लक्षणे व एड्स पासून वाचण्यासाठी घ्यावयाची दक्षता, काळजी या विषय विस्तृत व सखोल माहिती सांगितली तसेच श्री. प्रमोद भालेराव साहेबांनी एड्स ची जिल्हाची, दिडोरी तालुक्याची ची सद्यःस्थिती आकडेवारी नुसार सविस्तर माहिती सांगितली तसेच कार्यकमांचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी आपल्या भाषणात एड्स वाचा तरुण तसेच एड्स पासून घ्यायची काळजी व जनजागृतीची गरज, शिक्षकाची भूमिका.या विषयी सखोल माहिती सांगितली त्याचाच एक भाग म्हणून ज्यु.कॉलेज ऑफ एज्यु., दिंडोरी येथील महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली त्यांचे अध्यक्ष डॉ. संजय काळोगे, उपाध्यक्ष श्रीमती. स्मिता ठाकरे मॅडम, सचिव श्री. मनोहर धामणे तसेच सदस्य म्हणून मृणाल रामकृष्ण फंड, धनश्री विठ्ठल वाघ , तुषार माणिक चव्हाण, वैभव आनंदा राऊत, माधव अरूण सातपुते यांची निवड करून विविध उपक्रमांद्वारे एड्स जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रम प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापक यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची ग्रामीण रुग्णालय दिंडोरी यांच्या मार्फत विविध रोगनिदान टेस्ट चाचणी करण्यासाठी रक्तांचे नमुने घेण्यात आले
      सांस्कृतिक समिती प्रमुख व स्काऊट गाईड अंतर्गत रोव्हर-रेंजर लीडर प्रा.डॉ. अनिल भोळे, उपप्रमुख प्रा. श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका कु. मृणाल फंड हीने केले.फलक लेखन शितल गायकवाड, ज्योती कामडी यांनी केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री. संजय कदम, श्री. शिंदे एस.जे., श्री. बोराडे पी.एन. डॉ. श्रीमती प्रतिभा जगताप ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, क्रिडा शिक्षक लिलके बी.एम. संगीत शिक्षक शुभम थेटे, श्री. बाबा मोरे, श्री.कराटे केशव, नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, प्रभाकर गावित, सोमनाथ उखर्डे आदींबरोबर प्रथम व द्वितीय वर्षछात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने