महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ढकांबे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

दिंडोरी l प्रतिनिधी:- क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 
    यावेळी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आदिती सानप व इयत्ता नववीची विद्यार्थिनी समृद्धी बोडके इत्यादी विद्यार्थ्यांची भाषणे झाली इयत्ता आठवीचे विद्यार्थिनी आदिती सानप हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा अर्थ आपल्या भाषणातून विषद केला 
     मुख्याध्यापक अनिल ताडगे यांनी तिच्या या भाषणाचे कौतुक करून महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय व तो का साजरा केला जातो याविषयी मनोगतातून माहिती दिली .शिक्षिका लता काकड ,शिक्षक रघुनाथ उगले व सुभाष सांगळे यांनी डॉ. आंबेडकरांचा जीवनपट आपल्या मनोगतातून व्यक्त केला यावेळी गायकवाड मॅडम सरला आव्हाड व अशोक गीते या सह विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने