दिंडोरी l प्रतिनिधी :- दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने विविध मागण्यासाठी दिंडोरी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून यावेळी तालुक्यातील मुलभूत सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या तसेच सामाजिक प्रश्न अधिकारी वर्गासमोर मांडण्यात येऊन याबाबत चर्चा विनिमय करण्यात आला यावेळी किमान एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली होती,
मोर्चा मधील किसान सभेदरम्यान प्रमुख पदाधिकारी यांनी तहसिलदार मुकेश कांबळे,गटविकास अधिकारी भास्कर रेंगटे आदींसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत मागण्या मान्य करण्याचे हितगुज करीत मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे निर्देश दिले,
यावेळी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन तहसिलदार मुकेश कांबळे यांना दिले,याप्रसंगी किसान सभेचे किसन गुजर, देविदास वाघ, आप्पा वटाने, रमेश चौधरी, श्रीराम पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या-
वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी,ओला दुष्काळ जाहीर करावा, वनपट्टेधारक शेतकरी यांच्या शेत पिकाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, घरकुल मजुरी रोजगार हमी मार्फत हप्ता त्वरित वितरित करण्यात यावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा यामध्ये सुधारणा करण्यात यावी, ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांचे मनमानी कारभार थांबवावा व त्यांवर अधिकारी वर्गाचे वचक असावे, रेशन कार्ड बाबत च्या बाबत सुधारणा करावी