महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिंपळगाव केतकी येथे कर्करोग तपासणी शिबिर

दिंडोरी । प्रतिनिधी :- पॅरनार्ड रिकार्ड फाऊंडेशन आणि सीएसआय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एससीसी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या सहकार्याने पिंपळगाव केतकी येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
      शिबिराचे उद्घाटन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर, स्तन कॅन्सर व मुख कॅन्सर यांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी गावातील जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतीमार्फत व आरोग्य सेवक व आशा सेविकांमार्फत गावात पूर्वजनजागृती करण्यात आली. याप्रसंगी डॉ. रोशनी बोराडे, यशोदा साबळे, मरियम राऊत, सरपंच संगीता बोंबले, उपसरपंच कल्पना उखर्डे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती अनिल देशमुख, ग्रामसेवक चंद्रकांत पाटील, आशा सेविका सुवर्णा घाणे, माजी सरपंच बाळू पवार, माजी सरपंच भारती गांगोडे. सदस्या मनीषा दुरढवळे, सुनिता गायकवाड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने