महाराष्ट्र ट्रायबल न्युज

राष्ट्रीय गणित दिन उत्सवात साजरा

दिंडोरी l प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी येथील महाविद्यालयात सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय गणित दिन, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थिती व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख वक्ते अध्यापकाचार्या श्रीमती.डॉ. प्रतिभा जगताप मॅडम यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय गणित दिवस भारतात दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या दिवसाची घोषणा केली होती.श्रीनिवास रामानुजन हे भारताचे एक निष्णात गणितज्ञ होते, ज्यांनी गणिताच्या क्षेत्रात अनेक क्रांतिकारी शोध लावले. त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी २०१२ रोजी मद्रास विद्यापीठात घोषणा करण्यात आली की, २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस असेल या दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढवणे आणि त्याचे महत्त्व पटवून देणे हा आहे. अशा प्रकारची सखोल व विस्तृत माहिती सांगितली कार्यक्रम प्रसंगी द्वितीय वर्ष छात्राध्यापक चव्हाण तुषार व शितल बोरसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणित विद्यार्थ्यांना अमूर्त विचार समजण्यास मदत करतं आणि विज्ञान, तंत्रज्ञाना सारख्या इतर विषयांसाठी मजबूत पाया तयार करते तसेच सर्वच क्षेत्रात असलेले गणिताचे महत्त्व आवश्यकता विशद करतानाच ते तर्कशक्ती वाढवून जटिल समस्यांचे निराकरण शिकवतं, ज्यामुळे शैक्षणिक यश मिळविणे गणित विषयात शक्य होते म्हणून गणिताची मैत्री करून शालेय गणिता बरोबर जीवनाच्या गणिताला सामोरे जाण्याचे आव्हान केले यावेळी गणित विषया संदर्भातील भरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ संजय काळोगे यांनी केले. डीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गणिताचे साहित्य स्वतः तयार करून प्रदर्शनात मांडले होते. यात प्रथम क्रमांक धनराज हाडस (Algebric Formulas), द्वितीय क्रमांक सविता तरवारे( पूर्णांकयुक्त अपूर्णांक), तृतीय क्रमांक सविता धुळे ( टाकाऊ चहाच्या कपापासून टिकाऊ पाढे पाठांतर कृती कार्यक्रम ), तसेच उत्तेजनार्थ म्हणून भावना बागुल ( पाढे पाठांतरांसाठी सोपी शैक्षणिक कृती)व धनश्री वाघ ( सम आणि विषम संख्या वाचन चार्ट ) यांना प्राधान्य देण्यात आले.
         सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ.अनिल भोळे, उपप्रमुख प्रा. श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापिका कु. वाघ धनश्री हीने केले. तर आभार कु. अनुजा वासले हीने मानले फलक लेखन शितल गायकवाड, ज्योती कामडी, मनिषा जाधव यांनी केले. तसेच पंकज भोये, दिपक महाले यांनी फोटो काढले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री. संजय कदम, श्री. शिंदे एस.जे., श्री. बोराडे पी.एन.,ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली,संगीत शिक्षक शुभम थेटे, श्री. बाबा मोरे, श्री.कराटे केशव, नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, प्रभाकर गावित, सोमनाथ उखर्डे आदींबरोबर प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने