दिंडोरी l प्रतिनिधी:- वारे येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनानिमित्ताने श्री पंचावतार उपहार व द्वीप प्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजेपासून करण्यात आले होती त्यात देवपुजेस मंगल स्नान , श्री दत्तात्रेय कवच पारायण गीता पाठ पूजा ,प पु.म.श्री मयंक राज बाबा महानुभाव भरवस फाटा व सन्माननीय सदभक्त गोकुळ भाऊ झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, 108 दांपत्याच्या शुभ हस्ते श्री दत्तात्रेय महापूजा संपन्न झाली पंचावतार उपहार संन्यास दीक्षा विधी आरती , भोजन , श्री मूर्तींची भव्य मिरवणूक देव पूजा वंदन व विडा अवसर दीप प्रज्वलन सोहळा व प्रवचन कीर्तन भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री मूर्तींची मिरवणूक पारंपरिक नृत्य वाद्य व इलेक्ट्रॉनिक वाद्य यांच्या माध्यमातून वारे ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत काढण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. गोकुळ भाऊ झिरवाळ शाम गावित, प्रकाशशेठ पिंगळ , हेमलाताई गावित , आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत , साधू संत महंत तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
प्रतिक्रिया :-
(प.पू.श्री सचिन राज बाबा कपाटे. श्री कृष्ण मंदिर वारे संचालक.)
सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येक माणसांच्या मनोमनी अध्यात्मिक ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याकरिता हा सोहळा संपन्न होत असतो. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या असीम कृपेने सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो भाविक भक्तांना परमेश्वराच्या ज्ञान प्रकाशाचे वरदान प्रदान करण्याची शुभकामना .दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सहस्त्र दीप प्रज्वलन सोहळा व श्री दत्तात्रेय महापुजेचे आयोजक करण्यात येत असते या साठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या दिप प्रज्वलन सोहळ्यात सहभागी होतात.