सदर शिबिर मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी सर, डॉ. बाळू पाटील सर, डॉ. आनंद पवार सर तसेच ग्रामीण रुग्णालय पेठचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. समाधान पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या शिबिरामध्ये मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension) तसेच कर्करोग तपासणी करण्यात आली.
शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय पेठ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज भुसारे सर, NCD समुपदेशक श्री. दिलीप देशमुख, अधिपरिचारिका मंजना दराडे व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
तसेच या उपक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरातील तपासणी तपशील :
एकूण लाभार्थी : 103
एकूण स्क्रिनिंग : 103
मधुमेह तपासणी : 103
उच्च रक्तदाब तपासणी : 103
तोंडाच्या कर्करोगाची तपासणी : 103
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असंसर्गजन्य रोगांविषयी जनजागृती होऊन वेळेवर तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला, अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.