खोकरविहिर l प्रतिनिधी:- दि.21/12/2025 रोजी आपली माणसं आपलं गावं या जलपरिषद उपक्रमात अंतर्गत बाऱ्हे येथे ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रमात प्रदीप गिते सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. गिते साहेब यांनी बाऱ्हे परिसरात गावं पाड्यातील परिस्थिती न्याहाळून योग्य मार्गदर्शन नाची गरज लक्षात घेऊन युवक वर्ग एकत्र करून त्यांना मार्गदर्शन केले गावागावात जाऊन विविध सांस्कृतिक, धार्मिक उत्सवात जाऊन जनजागृती साठी मार्गदर्शन केले, रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षित युवकांना पोलीस प्रशिक्षण वर्ग सुरु केले यात रनींग, गोळा फेक, स्पर्धा परीक्षा पेपर, असे उपक्रम सुरु केले याबाबरोबर ट्रेकिंग, सहलीचे आयोजन करून विविध ऐतिहासिक स्थळाला भेटी देण्यात आल्या गरजू युवक, युवतीना बूट मोफत उपलब्ध करून देण्यात आले. पोलीस पूर्व प्रशिक्षण साठी ग्राउंड तयार केले, विविध स्पर्धा बक्षीस वितरण, जनजागृती रॅली, ग्रामीण भागात पर्यटन वाढीस टुरिस्ट यांचे स्वागत करण्यात आले भिवतास धबधबा येथे सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सांस्कृतिक उत्सवास सहकार्य असे विविध उपक्रमा द्वारे काम केल्याने या सामाजिक कार्याची पावती म्हणून जलपरिषद मित्र परिवार यांच्या कडून प्रदीप गिते साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह देण्यासाठी जल परिषद तर्फे गितेश्वर खोटरे, आंबोडे सरपंच राजेंद्र निकुळे,पांडुरंग धुम, नामदेव पाडवी,गोरख महाले, हंसराज भोये,विष्णू कांत (आबा) गिते देविदास पाडवी, एकनाथ गांगोडे, काशिनाथ गवळी, नवनाथ गांगोडे, नितीन गांगुर्डे, राकेश दळवी,संजय गवळी,लक्ष्मण पाडवी,संजय पडेर, विजय चौधरी, हरिदास महाले, भगवान महाले, नारायण गभाले, प्रसाद बोडस, दिपक गुप्ते, प्रदीप चौधरी, योगेश कर्णिक,देविदास कामडी सुभाष दळवी, तसेच उंडओहळ, घाणीचापाडा, भेनशेत, देऊळपाडा, वडपाडा, सागपाडा, खोबळा दिगर, कहांडोळपाडा(खो), खिरपाडा, वांगंणपाडा, भाटी, खिर्डी, उंबूरणे बाऱ्हे, गोपाळपूर, ठाणगाव, आंबोडे, बेडसे, केळावण खोकरविहीर, चिंचपाडा,चिऱ्याचा पाडा, कळमणे, आमदा बाऱ्हे,इत्यादी उपस्थित होते.
प्रदीप गिते सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा जलपरीषद कडून सन्मान
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0