म्हसवड l प्रतिनिधी :- इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोर (IIHMR-B) व व्दारा हेल्थ फायनान्स, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने म् हसवड येथील संत नामदेव महाराज मंदिर येथे दि. 19 डिसेंबर 2025 रोजी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच रक्ताल्पतेसारख्या समस्यांची वेळीच ओळख पटवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरामध्ये महिलाचा सहभाग मोठया प्रमाणात होता.एकूण 120 महिलांनी मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. प्रशिक्षित हेल्थ सखींच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षित व शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या हिमोग्लोबीन पातळीची माहिती देण्यात आली तसेच कमी हिमोग्लोबीन आढळलेल्या महिलांना सकस आहार, जीवनशैली सुधारणा व पुढील वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शार्दुल फुटाने ,आश्विनी फुटाने रूपाली जोशी, संगीता दोशी सुनिता नामदास उर्मीला गोंजारी यांची उपस्थिती होती.
यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोरचे प्रतिनिधी मोहन आचार्य तसेच द्वारा हेल्थ फायनान्स चे सचिन अय्यर व हेल्थ सखी श्रीदेवी माने,रेश्मा माने, किर्ती मसाळ, सायली शेंङे.आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
परिसरातील महिलांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरासाठी म्हसवङ हेल्थ सखीनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन सायली शेंडे यांनी केले.हे शिबीर उत्साहात पार पडले.