महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ननाशीत जनता विद्यालयाच्या वतीने पेसा दिन उत्साहात साजरा.

ननाशी | विनोद गायकवाड:- येथील गजानन महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ देवळा संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी भागातील ग्रामसभेला मिळालेले अधिकार, स्वशासनाची संकल्पना तसेच पेसा कायद्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पेसा कायदा म्हणजे काय, या कायद्यामुळे आदिवासी समाजाला कोणते अधिकार मिळाले आहेत, ग्रामसभेचे महत्त्व व स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पेसा कायद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा व संसाधनांचे संरक्षण कसे करता येते याची माहिती दिली.
      विद्यार्थ्यांनी पेसा कायद्यावर आधारित भाषणे, घोषवाक्ये व विचार मांडले. “ग्रामसभा हाच खरा लोकशाहीचा पाया आहे” हा संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पेसा कायद्याचे पालन करण्याची व जनजागृती करण्याची शपथ देण्यात आली.
    या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य डी.एन.आहिरे,ए.बी.पानसरे,आर.एन.शिंदे,पी.आर.बनकर,ए.जी.सूर्यवंशी,आर.व्ही.पवार,एन.एस.जाधव,एन.ए.जाधव,एल.जे.जाधव,एस.एन.बोरसे,एस.बी.आहिरे,श्रीमती,सुमित्रा चौधरी,गौरी आहिरे,सविता सुरवंशी,यांचेसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेसा दिन साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यात जनता विद्यालयाने मोलाची भूमिका बजावल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने