खोकरविहीर l प्रतिनिधी:- दिनांक २१-१२-२०२५ रोजी त्र्यंबकेश्र्वर तालुक्यातील वाघचौडा या पाणी टंचाई गावाला Wells on Wheels चे संस्थापक अध्यक्ष श्री. शहाज मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या माध्यमातून ६० कुटूंबाना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले.
ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यसमोर ठेऊन वेळेची बचत होऊन आजार उद्धभवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात. उदा. पाणी आणण्या पासून यामुळे बराचसा वेळ जातो. यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकतं नाही. ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून वाघाचौडा गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. यामुळे मुलींचा पाणी वाहण्याचा वेळ वाचणार आहे. जलचक्री वाटप कार्यक्रमवेळी संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, अनुज अहिरे, ओम भालेराव, ज्ञानेश्वर पवार तसेच गावतील शिक्षक तुकाराम भवर, तुकाराम किरकिरे व
इतर महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.