वलखेड l प्रतिनिधी :-दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वलखेडचे शिक्षक उत्तम चारोस्कर यांचे कडून 100 पुस्तके भेट म्हणून देण्यात आले.
चला पुस्तक वाचूया 100 दिवस वाचन चळवळ या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांनी केले या उपक्रमा अंतर्गत येथील भूमिपुत्र शिक्षक असलेले उत्तम भास्कर चारोस्कर वलखेड जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेला शंभर पुस्तकांची भेट व शाळेतील मुलांना चॉकलेट व बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
याप्रसंगी सरपंच हिरामण पाटील, नारायण राजगुरु, रमेश पाटील, रामदास चारोस्कर, माणिक शिंदे, कैलास शिंदे, मोहन शिंदे, सुभाष शिंदे, नारायण शिंदे, आनंदा चारोस्कर, रामदास बोंबले, मुख्याध्यापक रामदास गायकवाड, शिक्षिका कुमोदिनी पवार, गीता बहिरम, कौशल्या गायकवाड आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.