महाराष्ट्र ट्रायबल न्युज

के आर टी वणी महाविद्यालय येथे राज्य क्रीडा दिन साजरा

वणी l प्रतिनिधी:- कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी राज्य क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो यावेळी खाशाबा जाधव यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत खाशाबा जाधव यांच्या विषयी विविध पैलुद्वारे माहिती सांगितली त्याचबरोबर गरीब,शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी हा ऑलम्पिक ला पदक प्राप्त करू शकतो तर आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक एका खेळामध्ये आपले नैपुण्य दाखवून शासकीय नोकरीमध्ये देखील आपले स्थान निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले राहणीमान आपलं खान पान, झोप , डायट याविषयी कटाक्षाने लक्ष देऊन आपलं आरोग्य तंदुरुस्त आणि आनंदी ठेवावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानाचा वापर करून आपली तंदुरुस्ती वाढवावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य वाय एम साळुंके , कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री गायकवाड एस बी डॉ ज्योती पवार, प्रा उमेश देशमुख ,प्रा आर एन बागुल,श्री सचिन बोंबले (क्रीडा शिक्षक) विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर आर चव्हाण यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने