त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:- दि.१३ जानेवारी २०२६ वार मंगळवार रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर पोलीस मैदानावर या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी मैदानी क्रीडा स्पर्धा निवड चाचणी पार पडली.
या राज्यस्तरीय निवड चाचणीत एकात्मिक *आदिवासी विकास प्रकल्प, नासिक* अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा *शिरसगाव* ता.त्र्यंबकेश्वर जि.नासिक येथील *कु.सानिका चौधरी* या खेडाळु विद्यार्थीनीने *१५०० मी. धावणे व ५००० मी धावणे,* या दोन क्रिडा प्रकारात *प्रथम क्रमांक* मिळवत विजय संपादन करून *छत्तीसगड* या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या आदिवासी *खेलो इंडिया* २०२५-२६ या राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या खेळाडू विद्यार्थीनीला *क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले,* भगवान हिरकुड, हिरामण टोपले,व दयानंद चौधरी, अधिक्षिका पुणम बावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील खेडाळु विद्यार्थ्याचे तसेच मार्गदर्शकांचे *सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे (भा.प्र.से),* सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमिला सावंत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी संदिप चंदनशिवे, शाळेचे *मुख्याध्यापक दिपक भास्कर,* अधिक्षक अरुण बागले, शिक्षकवृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी व शाळा व्य. समिती अध्यक्ष अरुण महाले व सदस्य,पालक यांनी अभिनंदन करत *छत्तीसगड* या ठिकाणी होणाऱ्या *राष्ट्रीय* क्रीडा स्पर्धेत विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.