महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*निळवंडीचा पत्रकार सन्मान सोहळा कौतुकास्पद : नगरसेवक नितीन गांगुर्डे*

निळवंडी । मनोज पाटील:- निळवंडी ग्रामपंचायत, जय कानिफनाथ पाणीवापर संस्था व ग्रामस्थांच्या वतीने पत्रकारदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला पत्रकार सन्मान सोहळा प्रेरणादायी, उत्साहवर्धक व संस्मरणीय ठरला, असे प्रतिपादन दिंडोरी नगरपंचायतचे नगरसेवक तथा पत्रकार नितीन गांगुर्डे यांनी केले. 
    निळवंडी ग्रामपंचायत, जय कानिफनाथ पाणी वापर संस्था व समस्त ग्रामस्थांच्या वतीने तालुका प्रतिनिधी पत्रकारांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी नगरसेवक नितीन गांगुर्डे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास पाटील, पोलिस पाटील अंबादास पाटील, माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर भारत खांदवे, जय कानिफनाथ पाणीवापर संस्थेचे चेअरमन सुनील पाटील, माजी उपसरपंच भाऊसाहेब पाटील, सरपंच मनिषा चारोस्कर, उपसरपंच शंकर पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. नगरसेवक नितीन गांगुर्डे पुढे म्हणाले की, दिंडोरी तालुक्यात अनेक ग्रामपंचायती असल्या तरी सलग पाचव्या वर्षी पत्रकार सन्मानाचा उपक्रम राबविणारी निळवंडी ही एकमेव ग्रामपंचायत असून इतर ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सत्य परिस्थिती निर्भीडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. ग्रामीण भागातील प्रश्न व सर्वसामान्यांचे दुःख शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळेच शक्य होते, असे मत यावेळी नगरसेवक तथा पत्रकार नितीन गांगुर्डे यांनी व्यक्त केले. 
याप्रसंगी पत्रकार नितीन गांगुर्डे विलास ढाकणे, संतोष कथार, भगवान गायकवाड, अशोक निकम, बापू चव्हाण, बाळासाहेब अस्वले, अशोक केंग, सुनील जाधव, संतोष निकम, मनोज पाटील, पोपट गवारी आदी पत्रकारांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, डायरी व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कैलास पाटील, गणेश हिरे व सोमनाथ पताडे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांच्या वतीने संतोष कथार, भगवान गायकवाड, बापू चव्हाण व संतोष निकम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र पवार यांनी केले तर आभार क्लार्क अनिल पाटील यांनी मानले. यानंतर सर्व पत्रकारांनी जय कानिफनाथ पाणीवापर संस्थेच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. संस्थेच्या वतीनेही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय लष्कर दिनानिमित्त माजी सैनिक मेजर भारत खांदवे यांचा ग्रामपंचायत, जय कानिफनाथ पाणीवापर संस्था, ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गणेश हिरे, अनिल चारोस्कर, कचरु पवार, विश्वनाथ पाटील, सोमनाथ पताडे, पोपटबाबा पाटील, एकनाथ डंबाळे, मधुकर पवार, आत्माराम पाटील, भाऊसाहेब वाघ, भाऊसाहेब गवारी, विजय पाटील, माणिक पताडे, साईराम बोंबले, साहेबराव चारोस्कर, प्रकाश गवारे, साहेबराव पाटील, विष्णू पाटील, नंदु पाटील, झुंबर पाटील, पुंडलिक चारोस्कर, माधव चारोस्कर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने