महाराष्ट्र ट्रायबल न्युज

निसर्गाच्या सानिध्यात रंगले वनभोजन;आश्रमशाळा शिरसगावचा स्तुत्य उपक्रम...

अलंगुण l प्रतिनिधी:- दि. १६ जानेवारी २०२६ वार शुक्रवार रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा *शिरसगाव* या शाळेकडून ' *वनभोजन* ' कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले.
      शालेय जीवनात पुस्तकी ज्ञाना सोबतच निसर्गाशी नाते जोडले जावे, या उद्देशाने या वन भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
     निसर्गरम्य परिसर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिरसगाव गावाजवळील निळउंबर या पाड्याजवळ जंगलात,नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.   
       सकाळीच सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी नाचत- गात, पायी चालत नियोजित स्थळी पोहचले. वाटेत विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध वृक्ष, पाने, फुले आणि वेली यांचे निरीक्षण केले.
        यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खेळ, गाणी आणि नृत्याचा मनमुराद आनंद लुटत हा दिवस साजरा केला.
       त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याच ठिकाणी सर्वानी मिळुन तयार
केलेल्या *मिष्ठान्न भोजनाचा* सर्वानी एकत्र बसुन सहभोजन करत आस्वाद घेतला.
       तसेच केवळ मौजमजा न करता शिक्षकांनी यावेळेस विद्यार्थ्यांना जंगलातील वनस्पती, विविध वृक्षवेली, नदीतील जलचर प्राणी तसेच खडकांचे प्रकार या विषयी सखोल माहिती समजावून सांगितली. 
            यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या कुशीत प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
             या उपक्रमाबाबत बोलतांना मुख्याध्यापक दिपक भास्कर म्हणाले की *"विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी आणि त्यांच्यातील सामाजिक भावना वाढवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असुन अश्या वन भोजन व सहभोजन उपक्रमामुळे विद्यार्थी निसर्गाच्या जवळ जातात आणि त्यांच्यात संघभावना निर्माण होते."* 
 सदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरात कचरा होणार नाही याची दक्षता घेत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.
 *"आपण आलो तसाच निसर्ग स्वच्छ ठेवुया"* हा संदेश यावेळी देण्यात आला.
               या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर, अधिक्षक अरुण बागले, अधिक्षिका पुणम बावणे, माध्यमिक शिक्षिका सिता भोये, माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले, अमोल कामडी, सुमेध खिल्लारे, प.प्रा.शिक्षक संदिप रुपनर, प्रा.शिक्षिका शोभा जाधव, प्रा.शिक्षक मधुकर लहारे, अमोल कोपरेकर, योगेश्वर चव्हाण, मनोहर लहारे, पवन महाले, किरण राऊत तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी किसन टबाले,अनुसया गायकवाड, आरती वाघमारे, हेमंत महाले, लिला महाले, कमल कोंगील, हेमराज धुम, पुंडलिक सहारे, पुष्पा गावित व राहुल वार्डे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 
      तसेच शाळा व्य. समिती अध्यक्ष अरुण भाऊ महाले , सदस्य, पालक, सामाजिक कार्यकर्ते रामदास महाले, हिरामण राऊत, उपसरपंच भगवान महाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
       अशा प्रकारे *निसर्गाच्या कुशीत घालवलेला हा दिवस सर्व विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणारा ठरला.*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने