वणी l प्रतिनिधी:- मविप्र संस्थेअंतंर्गत असलेल्या विविध महाविद्यालयासाठी मविप्र युवा स्पंदन हा उपक्रम संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाबरोबरच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे उद्याचे उत्तम कलाकार आपल्याला मिळणार आहे असे प्रतिपादन मा. डॉ.एन.के. जाधव (शिक्षणाधिकारी,मविप्र समाज नाशिक) यांनी केले. ते दिंडोरी महाविद्यालयात आयोजित मविप्र युवा स्पंदन प्राथमिक फेरी उदघाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
युवा स्पंदन प्राथमिक फेरी कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ मंगळवार दि.२० जाने. २०२६ रोजी पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. विलास देशमुख (शिक्षणाधिकारी, मविप्र समाज नाशिक) हे उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हेल्दी स्पर्धा असायला हवी. एकमेकांना मदत करत पुढे जायचे. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर येणार नाही त्यांनी नाराज होऊ नये परत जास्त मेहनत करावी व जे पुढील फेरीसाठी जातील त्यांना शुभेच्छा द्याव्यात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी. कदम यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यातील कलेचे प्रयोजन करून तिचा विकास करणे गरजेचे आहे.
सदर कार्यक्रमासाठी मा. श्री. मोगल सर (शिक्षणाधिकारी, मविप्र समाज नाशिक) (प्रा. तुषार पाटील (मविप्र, युवा स्पंदन जिल्हा समन्व्यक ) यांनी सदिच्छा भेट दिली.व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुजित मुरकुटे, हे उपस्थित होते.
मविप्र युवा स्पंदन बक्षीस वितरण बुधवार दि.२१ जाने. २०२६ रोजी पार पडले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्राचार्य डॉ.एस.एस.काळे (वणी महाविद्यालय) हे उपस्थित त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, कला माणसाला जगायला शिकवतात, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात,व्यक्तिमत्व विकसित करतात. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
युवा स्पंदन प्राथमिक फेरीमध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या सर्व विजेत्या स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून मा. श्री. संजय भुजबळ(मुख्य कार्यकारी सदस्य आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा,नाशिक),श्री.हेमंत संगमनेरे (संगीत शिक्षक) के.बी.एच. हायस्कुल व ज्यु.कॉलेज,गिरणारे, प्रा.श्रीमती.अर्चना जाधव,प्रा. श्रीमती उज्वला धोंडगे (जनता न्यू इंग्लिश स्कुल, दिंडोरी) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्व्यक म्हणून प्रा.श्रीमती प्रतीक्षा गरुड, यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती.सायली होळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.श्रीमती प्रतीक्षा गरुड यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील संघ प्रमुख, तसेच २३८ विद्यार्थी सहभागी होते त्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, ललित ह्या पाच कलाप्रकारातील २० उपकलाप्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.आर. आर. झोमन (उपप्राचार्य) डॉ. ए.पी भगत (समन्वयक, आय क़्यु.एस्सी) प्रा. गौरव सोमवंशी (सकाळ सत्र प्रमुख), प्रा. आर आर चव्हाण, ज्येष्ठ प्राध्यापक एस एम पागे प्रा.जी.के. तडवी,प्रा.श्रीमती.सायली होळकर, प्रा.श्रीमती प्रियंका गारे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.