दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली त्यात तालुकाध्यक्षपदी राजेंद्र गांगुर्डे तर सरचिटणीसपदी सुरेश जाधव यांची पुढील तिन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली राजेंद्र गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरनार,जिल्हासरचिटणीस धनराज वाणी ,जिल्हा कार्याध्यक्ष यशवंतराव गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष पी.ए.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली उर्वरीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे - उपाध्यक्ष-शिवाजी जाधव,कार्याध्यक्ष-तात्याबा पाटील ,कोषाध्यक्ष-सदू गाडेकर,सहचिटणीस-बाबूराव उघडे,चिटणीस-त्र्यंबक पिंगळ,तपासनीस-सोमा मोरे,कार्यकारिणी सदस्य - यशवंत उदार,दत्तू पागे,नारायण हिंडे,साहेबराव कावळे,मधुकर केदारे,विजय देशमुख,स्रीप्रतिनिधी - सुमन नाईक, सल्लागार - अण्णासाहेब कदम,दगू सोनवणे,इलियास सय्यद,श्रीपतराव देशमुख आदींची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नुतन कार्यकारीणीचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी निवडश्रेणी,एकस्तर वेतनश्रेणी,सेवानिवृत्ती वेतन,प्रलंबित अंशराशीकरण व उपदान आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली चर्चेत ,तुकाराम राऊत,भगवान शेवाळे,खैरनार,योगेंद्र पागे,रामदास धात्रक,दगडू खैरनार,चंद्रकांत शिंदे आदींनी भाग घेतला कार्यक्रमास मोतीराम कदम,सदाशिव ठेपणे,वसंत गांगुर्डे,महादू वाणी,सुभाष पानसरे,हनुमंत खांडवी,दौलत सुकटे,शिवाजी पागे आदींसह तालुक्यातील बहुसंख्येने सेवानिवृत्त बांधव उपस्थित होते प्रास्ताविक व आभार दगूजी सोनवणे यांनी आज मानले नुतन कार्यकारीणीचे तालुक्यातील सेवानिवृत्त बांधवांनी अभिनंदन केले आहे
पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्र गांगुर्डे तर सरचिटणीसपदी सुरेश जाधव
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0