महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी शेतकरी सहकारी संघाच्या व्हा चेअरमन पदी संतोष कथार यांची बिनविरोध निवड

दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी शेतकरी सहकारी संघाचे व्हा चेअरमन राहुल जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या व्हा चेअरमन पदासाठी आज संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. ही बैठक निवडणूक अध्यासी अधिकारी वैभव मोरडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस संघाचे चेअरमन बाळासाहेब जाधव, माजी व्हा चेअरमन राहुल जाधव, संचालक रामदास पिंगळ, भरत कड, रघुनाथ पाटील, रामभाऊ ढगे, सुनील मातेरे,सुरेश घुमरे, धर्मराज राऊत,दिलीप जाधव, रघुनाथ गायकवाड,गुलाबतात्या जाधव, तसेच महिला संचालक सौ. मीना मवाळ, सौ. सुमन घुमणे आदी उपस्थित होते.
       व्हा चेअरमन पदासाठी संचालक संतोष मनोहर कथार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर राहुल जाधव यांनी सूचक तर रघुनाथ पाटील यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. व्हा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी वैभव मोरडे यांनी संतोष मनोहर कथार यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
     या निवडणूक प्रक्रियेस सहायक अधिकारी सचिन काकड, संघाचे सचिव संजय जाधव यांनी सहकार्य केले. 
        यावेळी नामदेव घडवजे, दिनकर जाधव, रमेश मवाळ, बाळासाहेब धुमणे ,माजी सौनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत खांदवे,भगवान गायकवाड,अनिल आव्हाड,डॉ संदीप गोसावी,मनोज ढिकले, तसेच स्वीकृत संचालक भाऊसाहेब पाटील,रावसाहेब जाधव,निवृत्ती देवरे,सुक्रमदास बैरागी ,रामनाथ पिंगळ ,अतुल पताडे आदी उपस्थित होते.
       नवनिर्वाचित व्हा चेअरमन संतोष कथार यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने