महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*जानोरी गाव पाच कोटींचे बक्षीस घेणारच - सोनाली कुलकर्णी* *जानोरी गाव फारच कमालीचे सुंदर आहे - अभिनेत्री कुलकर्णी*

दिंडोरी l मनोज पाटील:- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मला जानोरी गावला येण्याची संधी मिळाली असून जानोरी गाव फारच सुंदर आहे असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी जानोरी येथील मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान कार्यक्रमात केले.
     मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या जानोरी गावात आल्यानंतर सुरुवातीला त्यांचे महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी लेझीम व ढोल ताशांच्या पथकाने स्वागत करण्यात आले नंतर अभिनेत्री कुलकर्णी यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उदघाटन व वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांचे बैलगाडीत बसून जानोरी गावात झालेले विकास कामे तसेच जानोरी गावातील रस्ते, घरे,मंदिरे दाखवण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायतने ग्रामस्थांसाठी प्लास्टिक मुक्तीसाठी बसवण्यात आलेल्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले व अभिनेत्री कुलकर्णी, वर्षा फडोळ व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले . यावेळी महात्मा फुले विद्यालयातील व जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
  यावेळी अभिनेत्री कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद केला की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जानोरी गावला मला येण्याची संधी मिळाली असून जानोरी गाव फारच कमालीचे सुंदर आहे तसेच मला बैलगाडीत बसून गावातील मोठ-मोठे वाडे, जुन्या पद्धतीचे सुंदर घर आहे. गावात अतिशय सुंदर विकास कामे झाले आहे.पुरातन काळातील मंदिरे दाखवण्यात आले तसेच गावात अनेक चित्रपटांची शूटिंग झालेले आहे त्यामुळे तुमच्या गावाला सेलिब्रेटी या अभियानासाठी आलेच पाहिजे अशी काही गरज नाही कारण जानोरी गावात अतिशय सुंदर विकास कामे केलेले आहे, त्यामुळे जानोरी गावाला पाच कोटींचे बक्षीस मिळणारच असे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.
    यावेळी कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, दिंडोरी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सहाय्यक गट विकास अधिकारी भरत वेंदे,सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके,विलास काठे,गणेश विधाते,संगीता सरनाईक,रोहिणी वाघ,ग्राम विकास अधिकारी नानासाहेब खांडेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, दिंडोरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,अंगणवाडी मुख्य परविक्षिका , अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस, आशा कार्यकर्त्या, दिंडोरी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने