बा-हे l नामदेव पाडवी :- जिल्हा रुग्णालय नाशिक क्रिकेट समिती द्वारे जिल्हा शल्य चिकित्सक करंडक क्रिकेट स्पर्धा अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे पार पडली. नाशिक जिल्ह्यातील उपसंचालक नाशिक, जिल्हा रुग्णालय नाशिक, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे 24 संघाने सहभाग घेतला होता. सर्व सामने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.
यात जिल्हा रुग्णालय नाशिक डॉक्टर संघ विजेता तर ग्रामीण रुग्णालय बा-हे हा संघ उपविजेता ठरला. तिसरे बक्षीस जिल्हा रुग्णालय नाशिक अ संघ, चोथै बक्षीस मलेरिया संघाने पटकावले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारूदत शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय बा-हे संघाचा उत्कृष्ट क्रिकेटर योगेश देशमुख यांनी तुफान फटकेबाजी करत 22 चेंडूत 100 धावा काढल्या. या जिल्हा शल्य चिकित्सक करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामीण रुग्णालय बा-हे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र बोरसे, डॉ.महेश जाधव, कनिष्ठ लिपिक राहुल बापट यांच्यासह कर्मचारी आदी उपस्थित होते.