दिंडोरी l प्रतिनिधी:- परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन ,वोक्हार्ट फाउंडेशन व ग्रामपंचायत खतवड तसेच वोक्हार्ट पीएचसी अवनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दिनांक 06 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मारुती मंदिर (ग्रामपंचायत कार्यालय जवळ खतवड) येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, दंतरोग तपासणी तसेच रक्त व इतर तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येतील.
वोक्हार्ट फाउंडेशन तर्फे सर्व प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असून, रक्त व लघवी तपासण्या, नंबरचे चष्मे, सॅनिटरी पॅड तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हे शिबिर ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.