महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत तालुका सांस्कृतिक मंचची बैठक उत्साहात

दिंडोरी l मनोज पाटील :- दिंडोरी तालुकात साहित्य क्षेत्रातील चळवळीचा प्रसार व्हावा व ती चळवळ टिकून राहावी तसेच नवदुतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेल्या दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचची नुकतीच सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष तुषार वाघ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी प्रथम दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार व इतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नवीन संस्थेच्या रजिस्ट्रेशनकामी प्रयत्न केल्याबद्दल तुषार वाघ व समाधान अपसुंदे यांच्या सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव मंजूर करून त्यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्च महिन्यात संस्थेचा उद्घाटन सोहळा घेण्याचे निश्चित करून वर्षभरात किमान ३ ते ४ सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले तर ग्रामीण साहित्य संमेलन हे त्रैवार्षिक घ्यावे यावर सर्वांचेच एकमत झाले. यावेळी झालेल्या चर्चेत 
दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा दैनिक देशदूतचे दिंडोरी विभागीय कार्यालय प्रमुख पत्रकार नितीन गांगुर्डे, डॉ. विलास देशमुख, डॉ. संदिप गोसावी, गोकुळ आव्हाड, सतीश वाळके, बापू् चव्हाण, रघुनाथ पाटील, अशोक निकम, जयवंत जाधव आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक व आभार ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र गांगुर्डे यांनी मानले. याप्रसंगी बैठकीस दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा पत्रकार नितीन गांगुर्डे, अमोल गणोरे, उदय आव्हाड, नारायण पालखेडे, सदाशिव वाघ, सचिन धुमणे, गोकुळ वडजे, कैलास गायकवाड अभिजीत राऊत, आदित्य नाईकवाडे निशांत शिरसाठ आदींसह सदस्य उपस्थित

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने