महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पारंपरिक, सेंद्रिय शेती करा नी कॅन्सर ला आळा

दिंडोरी l प्रतिनिधी :- ग्रामपंचायत खडकसुकेणे येथे सेंद्रिय शेती कार्यक्रम बाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असता *मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत* ग्रामपंचायत महिलांविषयी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद नाशिक मा. श्री. ओमकारजी पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या नवचेतना अभियान या संकल्पनेतून खडकसुकेणे गावातील ग्रामस्थांना सेंद्रिय शेतीचे महत्व व सेंद्रिय शेती करणे काळाची गरज या बाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन या बाबत पाहणी करून मार्गदर्शन केले.तालुक्याचे. श्री.भास्करजी रेंगडे सर गटविकास अधिकारी मा. श्री.भरतजी वेंदे सर सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते. उपसरपंच श्री मधुकर फुगट,शेतकरी पुरुषोत्तम गणोरे, नारायण पालखेडे, नाना जाधव ग्रामपंचायत अधिकारी श्री मनोहर गांगुर्डे ग्रा. प.सदस्य गावातील शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने