बा-हे l नामदेव पाडवी :- महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली व डांग राज्यातील पाडवी कुळ परिवारच्यावतीने आयोजित 19 वे वार्षिक स्नेहसंमेलन हे दि. ०08 फेब्रुवारी 2026, रविवार रोजी बलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यातील कोठायदरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक तारपा व संबळ वाद्यांच्या गजरात मंडपाच्या प्रवेशद्वारावर आरती करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सकाळी 11:00 वाजता पाडवी कुळाचे कुलदैवताचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात व दादरा नगर हवेली येथून आलेल्या बंधु-भगिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून कुटुंबातील ऐक्य, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यावर भर देत, कोणतीही समस्या उद्भवल्यास परिवार एकजुटीने मार्गदर्शन व मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. कुटुंबातील अडचणींवर सहपरिवार उभे राहून मात करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
संमेलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधु-भगिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेण्यात आला. कुटुंबाची ओळख, परंपरा व एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याबाबत सखोल चर्चा झाली.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संमेलन व्यवस्थापन, संस्थापक व आयोजक कोठायदरी बेलीधाम येथील परम पूज्य रामजी महाराज पाडवी तसेच पाडवी परिवार यांचे योगदान मोलाचे ठरले. उपस्थित सर्व बांधवांचे आभार व्यक्त करत एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप संमेलन वकील दत्तू पाडवी, नानू पाडवी यांच्यासह प्रमुख पाहुणे यांच्या भाषणाने झाला.
गावातील सर्व पाडवी कुटुंब सदस्य या स्नेहसंमेलनात महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमण-दीव व गुजरात येथील पाडवी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पाडवी, वेलजीभाई पटेल यांनी केले.