वैभव पगार | म्हेळुस्के : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के – लखमापूर रोड,कादवा नदीतीरावरील पुरातन श्री संगमेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी तेल , वात, पणती , मेणबत्ती साहित्य घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांनी उपस्थित राहून दीपोत्सव व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.