महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदर्श कलाशिक्षक सुनील पवार यांना ‘महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

कळवण l प्रतिनिधी:- दि. १५ फेब्रुवारी २०२६ 0अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य येथील अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” या मानाच्या पुरस्काराने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गणोरे (ता. कळवण) येथील आदर्श कलाशिक्षक तसेच मोहबारी येथील आदर्श उद्योजक, इव्हेंट व मंडप डेकोरेटरचे संचालक श्री. सुनील पांडुरंग पवार यांना सन्मानित करण्यात आले.
      कलेतील उत्तुंग भरारी आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगरचे महापौर धनंजय भैया जाधव, सायलीताई धनाबाई (संस्थापक, सायली फाऊंडेशन), रोहिणीताई पवार (आदर्श समाजसेविका) तसेच दीपक दीक्षित (आदर्श समाजसेवक व प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ) उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गणोरे येथील मुख्याध्यापक आदरणीय श्री. जयकिशोर राऊत सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्री. सुनील पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमास जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व प्रसिद्ध चित्रकार डॉ. भारत पवार, कलाशिक्षक रमेश गवळी सर व गिरीधर पवार सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
सुनील पवार सरांनी आपल्या कलेद्वारे आणि सामाजिक कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असून, हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने