दिंडोरी l प्रतिनिधी:-चाईल्ड सर्वाइवल इंडियन व परनोड रिकार्ड इंडिया फौंडेशन ग्रामपंचायत लोखंडेवाडी यांच्या सहकार्याने पोषण मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष आकर्षण म्हणून पोषण रेसिपी स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये महिलांनी स्थानिक अन्नधान्यांपासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करून सादर केले.
पोषण तज्ञ सौ. निंभा राठोड यांनी उपस्थित महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व, कुपोषणाची कारणे व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सादर करण्यात आलेल्या सर्व रेसिपींचे परीक्षण करून चार उत्कृष्ट व पौष्टिक पदार्थांची निवड करण्यात आली. विजेत्या चार महिलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या निमित्ताने हिमोग्लोबिन (HB) तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. एकूण 82 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली व त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एकूण ओपीडी उपस्थिती 94 इतकी नोंदविण्यात आली.
कार्यक्रमास सरपंच संदीपाभाऊ उगले, ग्रामपंचायत सदस्या शिमाताई गायकवाड, आशा सेविका अलका वटाणे व मैनावती कडवे, अंगणवाडी सेविका गौरी वाघ तसेच डेटा ऑपरेटर सचिन वटाणे तसेच चाईल्ड सर्वाइवल इंडिया संस्थेचा प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक वैभव खांडवी ,मेडिकल ऑफिसर डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे, फार्मसिस्ट ऋषिकेश गावंडे, हेल्थ एज्युकेटर सतीश , डेटा ऑपरेटर निशा पवार उपस्थित होते .
या पोषण मेळाव्यामुळे गावातील महिलांमध्ये पोषण व आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागली असून कुपोषण निर्मूलनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.