महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित स्वामी विवेकानंद स्कूल बाऱ्हे ता.सुरगाणा येथे दिव्यांग विद्यार्थी शिबीर संपन्न*

बा-हे l नामदेव पाडवी :-जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था, संचलित स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय बाऱ्हे ता. सुरगाणा जि.नाशिक येथे नॅशनल ट्रस्ट अंतर्गत बढते कदम आवारेनेस प्रोग्राम सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित इंडिया मुंबई अंतर्गत सुरगाणा तालुका दिव्यांग विद्यार्थी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानाची देवता सरस्वती माता यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव धुम होते. तर प्रमुख पाहुणे सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई सचिव श्रीमती.मंजुषा सिंग, श्रीमती.रोशनी हिरवटे, मनिषा देवरे प्रबोधिनी विद्यामंदिर नाशिक, वैशाली लहरे भावना चांडक अंधशाळा सातपूर नाशिक, संस्थेचे सदस्य यशवंत मोरे, प्राचार्य संदीप व्यवहारे, श्यामराव उबाळे, दिगंबर धुम, प्रकाश धुम, सुनील धुम, नानासाहेब हाके मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रबोधिनी विद्यामंदिर नाशिक, नितीन गांगुर्डे, पंचायत समिती सुरगाणा येथील विशेष शिक्षक गणेश पालवे, गोवर्धन भोये, मोहन वाघेरे, तुळसा चव्हाण यांच्यासह बा-हे परिसरतील ग्रामस्थ तसेच दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समिती सुरगाणा विशेष शिक्षक यांनी दिव्यांग विद्यार्थी शिबिरात मार्गदर्शन करताना सांगितले कि, अंधत्व,अल्पदृष्टी, कुष्ठरोग, श्रवणदोष, हालचाल अक्षमता, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, बुटकेपणा, सिकलसेल आजार, शिक्षण अक्षमता अशा विविध दिव्यांग प्रकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग आणि केंद्र सरकारद्वारे दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड, निरामया योजना, लीगल गार्डयनशिप आर्थिक सहाय्य, शिक्षण, आणि स्वयंरोजगाराच्या अनेक योजना संदर्भात सखोल मार्गदर्शन पंचायत समिती सुरगाणा विशेष शिक्षक गणेश पालवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश आहेर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने