पेठ l प्रतिनिधी:- आज पारंपरिक शेती किफायतशीर राहिली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल. अनेक आदिवासी तरूण आधुनिक शेतीकडं वळत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीनं 'गटशेती प्रकल्प' उपयुक्त ठरणार आहे. यासाठी पेठ तालुक्यातील जवळपास 150 आदिवासी शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून खास तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन युवा मित्र ट्रेनर सिन्नर येथे करण्यात आले होते .
आदिवासी शेतकऱ्यांसाठी पाणी फाउंडेशनचा उपक्रम निसर्ग आणि बाजार भाव हे शेतकऱ्यांच्या हाती नसले तरी, उत्पन्नावर होणारा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे शक्य आहे, हे गणित जमलं तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती केली तर आदिवासी शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी नांदू शकेल" असा संदेश देत गटशेती करण्याबाबत प्रेरणा देण्याचं काम पाणी फाउंडेशनच्या वतीनं केलं जात आहे. विशेष म्हणजे गत दोन-तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी होत आहे.
शेतकऱ्यांना दिला जातो खास मान : शेतकरी समृद्ध व्हावा हा पाणी फाउंडेशनचा मुख्य उद्देश असून तीन दिवशीय निवासी प्रशिक्षणाचे शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शेतकऱ्यांचे विविध गट पाडून प्रत्येकी तीन दिवसांचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शेतकऱ्याचे पाय धूऊन आणि औक्षण करून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पाणी फाउंडेशनच्या वतीनं मोफत करण्यात आल्याची माहिती, पाणी फाउंडेशनचे पेठ तालुक्याचे समन्वयक ..... यांनी सुंदर नियोजन केले होते.
गटशेती ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी : शेतकरी म्हटलं की, कष्ट आणि दुःख असं चित्र उभं केलं जातं. या प्रशिक्षणासाठी पेठ तालुक्यातील कृषी विभागाचे शेतकरी व अमितच्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी या या प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्या होत्या यावेळी त्या ठिकाणी विविध खेळांच्या माध्यमातून गट शेती तिचे फायदे व नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती , बियांचे गुण क्षमता बीज प्रक्रिया असे अनेक शेतीमधील महत्त्वाचे घटक याचे उत्तम असे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी प्रशिक्षक अजय माने , आशिष लाड , रोशनी जाधव ,सायली जंगले , अभिजीत पवार , शशांक गुरव, निकिता मोकल यांनी उत्तम अशा रित्या प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना आर्थिक व योग्य मार्गदर्शन केले