महाराष्ट्र ट्रायबल न्युज

लहान वयातील सामान्य ज्ञान स्पर्धां शासकीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक : खा. भास्कर भगरे

दिंडोरी । मनोज पाटील :- 
बालवयातील सामान्य ज्ञान स्पर्धां विविध पदांच्या शासकीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक असल्याचे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केले.
     दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे व उपक्रमशील शिक्षक नौशाद आब्बास यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून दिंडोरी तालुक्यातील इयत्ता 4 थी ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 75 प्रश्‍न व 150 गुणांची ज्ञान समृध्दी अभ्यासमाला सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट अंतीम चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी खा. भगरे बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, गणपत जाधव, भगवान गायकवाड, बापूसाहेब चव्हाण, संतोष कथार, संदीप गुंजाळ, श्रीमती साधना पेलमहाले, सोमनाथ दिघे, अनिल दिघे, माधवराव निगळ, छबु मटाले, रघुनाथ मोरे, जीवन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. खा. भास्कर भगरे पुढे म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी आपल्या इयत्तेत दिलेल्या अभ्यासक्रम तसेच तालुक्यापासून देशापर्यंतचा विविध घटकांचा व विषयांचा अभ्यास सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्ताने केल्याने त्यांचे पुढील शैक्षणिक जीवनात या अभ्यासाचा उपयोग होवून महाराष्ट्र लोकसेवा आयोजन, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विविध भरती प्रक्रियेत घेतल्या जाणार्‍या परीक्षेसाठी या उपक्रमाचा फायदा होईल, असे ते म्हणाले. यावेळी शिष्यवृत्ती व स्पर्धां परीक्षांची तयारी याविषयावर साधना पेलमहाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता 4 थी 7 वी च्या सहभागी विद्यार्थ्यांमधील प्रत्येक तीन क्रमांक निवडण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. इयत्ता 4 थी - प्रथम क्रमांक :- तन्वी वाघमारे (जि.प. शाळा बोरवण), गुण 146, व्दितीय  क्रमांक - दत्तात्रय कथार (जि.प.शाळा तळेगाव दि.), गुण 136, तृतीय  क्रमांक - यज्ञेश बोंबले (जि.प.शाळा अवनखेड), गुण 136, इयत्ता 5 वी -प्रथम - गौरी गावित (जि. प. शाळा भातोडे), गुण 138, व्दितीय- दिया रेहरे (जि.प.शाळा जऊळके दिंडोरी), गुण 136, तृतीय - आवणी सुरसे (जनता विद्यालय दिंडोरी), गुण 136, इयत्ता 6 वी.- प्रथम - रेहान मन्सुरी (जनता हायस्कूल, वणी), गुण 138, व्दितीय - मानसी गवळी (जि.प.शाळा जऊळके दिंडोरी), गुण 132, तृतीय - कुणाल पाटील (जि.प.शाळा जऊळके दिंडोेरी), गुण 124, इयत्ता 7 वी - प्रथम - श्रुतिका ठोंबरे (जि.प.शाळा अक्राळे), गुण 116, व्दितीय - गुंजन जाधव (जनता विद्यालय, दिंडोरी), गुण 106, तृतीय - साही नाठे (जनता विद्यालय, दिंडोरी), गुण 98. यांनी यश संपादन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रास्ताविक दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षक मित्र मासिकचे कार्यकारी संपादक सुनील पेलमहाले यांनी केले. आभार नौशाद आब्बास यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण कुडर्के, सागर जगताप, भुषण बोरस्ते, गोंविंद गिरी, ऋषीकेश खांदवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने