महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*नळवाडपाडा येथे मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न*

दिंडोरी l प्रतिनिधी:- परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड आणि ग्रामपंचायत नळवाडपाडा यांच्या संयुक्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
    या शिबिरामध्ये नळवाडपाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 241 नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. तसेच या शिबिरात देण्यात येणाऱ्या सेवा जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंतरोग तपासणी,रक्त तपासणी अशा विविध सेवा तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.उपस्थित महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
   या शिबिरामध्ये विविध विषयांवर आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले.
   या प्रसंगी ग्रामपंचायत नळवाडपाडा येथील सरपंच हिरामण गावित,
ग्रामसेविका ललिता खांडवी, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी रामदास महाले, देवराम चौधरी,आशा सेविका यांनी शिबिरास भेट देऊन मदत केली.
    वोक्हार्ट फाउंडेशनचे प्रोग्राम  Manager हुसेन शेख वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार, जनरल तपासणी डॉ. संजय देशमुख, स्त्रीरोग तज्ञ डॉ. परिमल चव्हाण,नेत्ररोग तज्ञ.सुरेश थोरे, दंतरोग तज्ञ डॉ. कस्तुरी दायमा,फार्मासिस्ट स्नेहा जाधव,लॅब टेक्निशियन कैलास वसावे,ज्योती मोगल,सिस्टर पुष्पा शार्दुल, हाऊस किपिंग कर्मचारी धनश्री बोरस्ते व ललिता धुळे आदी उपस्थित होते.
     या शिबिरामुळे नळवाडपाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने