दहिवेल l प्रतिनिधी - दि. 26 जुलै 2026
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात मार्गदर्शनासह *विद्यार्थी गुणगौरव सोहळा* कार्यक्रम दि.26 जुलै -2026 रोजी दहिवेल ता. साक्री येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष राहुल गावित यांनी केले.
विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबीराचे उदघाटन सहाय्यक निबंधक *मा. सुरेश रतीलाल पवार साहेब* व कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा. यशवंत पवार साहेब,* सेवानिवृत्त उपायुक्त तथा अध्यक्ष आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रम प्रसंगी समाजातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना प्रशिस्त पत्र देवून गौरवण्यात आले . उपस्थित विद्यार्थीना करिअर विषयक मार्गदर्शन प्रा. डॉ. सुलतान पवार , संकल्प आदियुवा संघटनेचे संस्थापक चेतन खंबाईत, इंजि के टी सूर्यवंशी रावसाहेब, ॲड. गजमल पवार, रमेश सूर्यवंशी व आदिवासी एकता परिषदचे प्रेमचंद सोनवणे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जगन्नाथ गायकवाड , देवा पवार , तुकाराम बहिरम सर, मांगीलाल गांगुर्डे सर, बी. एम. बागुल, मगनदादा पवार, वैजनाथ पवार , तसेच पेसा संघर्ष समितीचे सुरेश पवार, नितीन गांगुर्डे, सुरेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय देसाई व संकल्प नाशिक टीमचे अनिल बोरसे, कांतीलाल मोरे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश बोरसे यांनी तर आभार पंकज देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प आदियुवा विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय अहिरे , संकल्प आदियुवा साक्री तालुकाध्यक्ष विनित सूर्यवंशी , ताराचंद गांगुर्डे , किशोर कोकणी, संदीप गांगुर्डे, दयाल बहिरम, सुरेश गवळी, संदीप चौरे, सूरज अहिरे, नामदेव गायकवाड, लखन बहिरम आदींनी प्रयत्न केले.