महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीचे आरोग्य विषयक प्रश्न दोन्ही आरोग्य मंत्र्यांच्या दरबारीं.सकारात्मक चर्चा -नितीन गांगुर्डे

दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंडोरी शहरातील आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या जन आरोग्य समितीचे अध्यक्ष, नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी आरोग्य मंत्र्यांना साकडे घातले असून आरोग्य मंत्र्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे त्यांचबरोबर प्रशासनला तसें निर्देश दिले आहे.
      आज मंत्रालयात नितीन गांगुर्डे यांनी मंत्रिमंडळ बैठकी नन्तर आरोग्य मंत्री प्रकाश अंबिटकर व राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन दिंडोरी शहरातील गरीब जनतेच्या समस्या मांडल्या. यावर मंत्री महोदयांनी सविस्तर चर्चा केली. आदिवासी भागातील समस्या सोडवाण्याचे आश्वासन दिले. यावेली निवेदन देण्यात आले.
 दिंडोरी शहर हे आदिवासी बहुल पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांचे जवळचे तसेच रस्त्यावर वसलेले शहर आहे. नाशिकपासून जवळ तसेच सप्तशृंगगड, सुरत महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. तरी ंया ठिकाणी भविष्यातील गरजा ओळखून तातडीने आरोग्य विषयक सुविधा निर्माण कराव्यात.दिंडोरी नगरपंचायत हद्दीत श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच सुर्वण आहेरकार समाजाची विंध्यावासिनी देवीचे तिर्थक्षेत्र असून अक्राळे व जांबुटके एमआयडीसीमुळे येथे नोकरदार स्थिरवत आहे. येथील प्रवाही लोकसंख्या तीस हजारांवर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिंडोरी ग्रामीण रुग्णालयावर ताण पडतो. भविष्यात नाशिक येथे कुंभमेळा आहे एखादी दुर्घटना घडल्यास जवळचे रुग्णालय म्हणून दिंडोरी शहरात पर्यायी व्यवस्था म्हणून पाहिले जाते.या दोन्ही बाबींचा विचार करून येथे स्लम भागासाठी अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर व्हावे. यापूर्वी आपण पाठपुरावा करून इंदिरा नगर व गांधीनगर येथे दवाखाने सुरु केले आहेत.पेठ गल्ली राजेश्वर मंदिर हनुमान चौक परिसरात आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करावे. ज्यामुळे गावातील गरिबांना उपचार मिळतील.दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञाची जागा एक वर्षापासून रिक्त आहे. सर्व महिलांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. आदिवासी भागातून आलेल्या गरोदर मातांना तसेच गरीब महिलांना नाशिक येथे दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातून पाठवले जातात. अनेकदा वाहनाची सुविधा नसते.त्यांची गैरसोय होते. त्यामुळे तातडीने स्त्री रोग तज्ञाची नियुक्ती व्हावी. दिंडोरी येथील 108 रुग्णवाहिका कायम नादुरुस्त होत असते व तिची सुविधा मिळत नाही. पेठ दमण हायवे, सुरत हायवे, सप्तशृंग गड हायवे वर सातत्याने अपघात होत असल्याने रुग्णवाहिकेची गरज भासते जर नवीन रुग्णवाहिका दिली तर अनेकांचे प्राण वाचतील. 108 रुग्णवाहिकेवर जबाबदारीची जाणीव असलेले चांगले चालक नेमावे.नाशिक जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातून आदिवासी महिला पुरुष अ‍ॅडमीट होत असतात. परंतू येथील स्वच्छतागृहे अजिबात स्वच्छ नसतात. दिवसातून चार वेळेस स्वच्छता व्हावी. महिला कर्मचारी कामात टाळाटाळ करतांना दिसून येतात. तसेच डॉक्टर व नर्सचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. नाशिक सिविल हॉस्पिटल मध्ये त्यामुळे दुर्गंधी जाणवते. त्यावर उपाययोजना करावी. 
     नाशिक सिविल हॉस्पिटल येथील सीटी स्कॅन सातत्याने नादुरुस्त असते. त्यावर कार्यवाही व्हावी. ग्रामीण भागातून आलेला आदिवासी बांधवांना या सुविधेसाठी वणवण फिरावे लागते. खर्चही परवडत नाही. याबाबत नियोजन व्हावे. सोनोग्राफी मशिन बाबत सुद्धा सुध्दा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सोनाग्राफी मशिन आहे पण तज्ञ नाही. त्यांची नेमणूक करावी. सोनोग्राफी मशीन सध्या धुळखात पडले आहे.दिंडोरी येथील हिंदुहद्य सम्राट आपला दवाखाना गांधीनगर तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र इंदिरानगर येथे पुरेसा औषधसाठा नसतो. रॅबीज , सर्प दंश लस व बीपी, शुगर यांच्या औषधे गरीब रुग्णांना लाभदायक ठरत असल्याने ते उपलब्ध करावे.दिंडोरी, सुरगाणा, पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात रेबीज व सर्पदंश यांच्या लस उपलब्ध कराव्यात. दरवर्षी मध्यतरी तुटवडा भासत असतो.औषध पुरवठा नियमित व्हावा.कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार नियमित व्हावे. निधी पुरवठा नियमित व्हावा.
      दिंडोरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून थेथे उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस व कॅन्सर रुग्ण उपचार सुविधा आदिवासी भाग म्हणून विशेष बाब म्हणून मंजूर करावे 
     दिंडोरी येथे उपजिल्हा रुग्णालयात कामगार भरताना चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी स्थानिक दिंडोरी शहरातील विधवा महिलांना प्राधान्य द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.या मागण्या बाबत सकारात्मक प्रतिसाद आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले व समस्या लवकर सोडवू असे आश्वासन दिले.

दिंडोरी येथील आरोग्य विषयक समस्या बाबत आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करताना जन आरोग्य समितीचे अध्यक्ष नगर सेवक नितीन गांगुर्डे, दुसऱ्या छायाचित्रात निवेदन स्वीकारताना राज्यमंत्री नामदार सौ.मेघना बोर्डीकर.(छाया. बाळासाहेब अस्वले.)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने