महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यातील ढोल, पावरी, भोवाडा सोंगी मुखवटे कला झळकणार पश्चिम बंगालच्या रंगभूमी कलामंचावर

खोकरविहीर l प्रतिनिधी:- सुरगाणा ता.२०/६/२०२६
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तातापाणी माता कणसरा बोहाडा कलापथक पिंपळसोंड,ढोल, पावरी, ठाकर नृत्य,पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली कला 
         दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान कोलकाता येथील सिटी सेंटर-२ येथे आयोजित हॅण्डलूम व हॅण्डिक्राफ्ट प्रदर्शनात महाराष्ट्राच्या आदिवासी कला-संस्कृतीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळत असून कोलकाता येथील कलामंचावर सुरगाणा तालुक्यातील श्रीभूवन चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कलापथक यांचे डांगी नृत्य, ढोल पावरीचे सप्तसूर गुंजणार असून पिंपळसोंड येथील बोहाडा/ भोवाडा सोंगी मुखवटे कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांचे मुखवटे,लंकाधिपती राजा रावण ताटी, 
पालघर जिल्ह्यातील गंजाड येथील वारली चित्रकार १,
 बोहाडा मुखवटा कलेचे २ कलाकार, श्रीभुवन-चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कला पथकातील १५ कलाकार अशा एकूण १८ आदिवासी कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यामध्ये
पारंपरिक नृत्य
 पारंपरिक गीत-संगीत
 बोहाडा मुखवटा कला
 वारली चित्रकला
या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा महाराष्ट्र व देशाच्या विविध भागात पोहोचत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने आदिवासी कलाकारांना मिळालेले हे व्यासपीठ केवळ कार्यक्रमातील सहभाग नसून, त्यांच्या कला, कौशल्याला वाव मिळत असून रोजगार, सन्मान आणि राष्ट्रीय ओळख मिळवून देणारे महत्त्वाचे पाऊल पडते आहे.
 गाव कुशीतील कला आता देशाच्या व्यासपीठावर झळकत आहे. 
आदिवासी सोंगी मुखवटे कलाकार शिवराम चौधरी यांची सोंगी मुखवटे हस्तकला ब्रिटन, जर्मनी, इटली या देशांमध्ये पोचली असून 
राष्ट्रीय स्तरावर तसेच गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली,गोवा म्युझियम, 
सापुतारा आदी ठिकाणी पोचली आहे. 
हीच खरी सांस्कृतिक समृद्धी आणि आत्मनिर्भरतेची दिशा! 
कलापथकाचे नेतृत्व देविदास कामडी, 
रतन चौधरी,लक्ष्मण बंगाळ ,सुमनदास आदी करीत आहेत. 
सर्व सहभागी आदिवासी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने