दिंडोरी l प्रतिनिधी:- परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, TSL फाउंडेशन आणि संजीवनी प्राथमिक आरोग्य केंद्र 2.0 अवनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शाळेतील एकूण ५५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण आरोग्याची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता राखणे, संतुलित आहार घेणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
यावेळी TSL फाऊंडेशन व संजीवनी प्राथमिक आरोग्य केंद्र 2.0 अवनखेड येथील सीनियर मॅनेजर निलेश एक्का ,डॉ. शावेज शेख, नर्स चंचल सोनवणे आणि शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृद्ध उपस्थित होते.
परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, TSL फाऊंडेशन व संजीवनी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.