महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दहीहंडी उत्सवामध्ये सतीमाता गोविंदा पथकाची टीटोली व फागुलगाव येथे ५ थरांची दमदार सलामी

इगतपुरी l विक्रम वारूंगसे:- घोटी : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर, घोटी येथील सतीमाता गोविंदा पथकाने टीटोली व फागुलगाव येथे ५ थरांची यशस्वी सलामी देत आपल्या जिद्द, मेहनत आणि एकजुटीचे शानदार प्रदर्शन केले.
     गोविंदा पथकातील तरुणांनी उत्साह, शिस्त आणि धाडसाच्या जोरावर तब्बल पाच थरांचा मानवी मनोरा उभारून उपस्थितांची मने जिंकली. थर रचताना पथकातील सदस्यांमध्ये दिसून आलेली एकजूट आणि समन्वय विशेष आकर्षण ठरला.
      यावेळी परिसरातील नागरिक व गोविंदा प्रेमींनी पथकाचा उत्साह वाढवत मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. "गोविंदा आला रे आला!" या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
      सतीमाता गोविंदा पथकाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व गोविंदा वीरांचे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील काळातही पथकाने अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने