महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी महाविद्यालयात रसायनशास्त्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न तसेच पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा गौरव

दिंडोरी l प्रतिनिधी :-मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने “रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा तसेच पोस्टर स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत ८३ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला , तसेच त्यातील ५० विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत सक्रीय सहभाग घेतला.
     कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी रसायनशास्त्र विषयातील विविध रोजगाराच्या संधी, उद्योगक्षेत्रातील उपलब्ध संधी, कौशल्यविकास, खाद्यरसायनशास्त्र, औषधनिर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन तसेच उद्योजकतेच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
     या कार्यशाळेस आनंद अग्रो केअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. घनश्याम हेमाडे, व सह-संस्थापक, श्रीमती शोभा हेमाडे तसेच डॉ. बाळासाहेब पगार, प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक यांनी मार्गदर्शन केले. श्री. घनश्याम हेमाडे सर यांनी विद्यार्थ्यांना अगोदर आपल्याला काय व्यायचे आहे किवा काय करायचे आहे हे अगोदर मनाशी ठरवून घ्यावे व त्यानंतर आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे जो पर्यंत तुम्ही तुमचे लक्ष तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करु शकत नाही. त्यानंतर त्यांनी रसायनशास्र विषय घेऊन डिग्री व पी. जी. डिग्री घेऊन कोणत्या क्षेत्रात काम करु शकतात ते विद्यार्थ्यान पटवून दिले. श्रीमती शोभा हेमाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आपण जे करत आहे व जे करणार आहे त्यामुळे आपल्या आई व वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. वडिलांमुळे आपल्याला नाही तर आपल्यामुळे वडिलांना लोकांनी ओळखले तर वडिलांना आवडते व त्याचा त्यांना अभिमान वाटतो. तसेच महिलांसाठी कंपनीमध्ये संगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.  डॉ. बाळासाहेब पगार यांनी विद्यार्थ्यांना B.Sc. Chemistry नंतर उद्योग, प्रयोगशाळा, गुणवत्ता नियंत्रण, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, संशोधन व इतर क्षेत्रांतील करिअरच्या विविध वाटा याबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिमा पंडित वाघ यांनी विद्यार्थ्यांना मेहनत केल्याशिवाय कोणतेही यश मिळणार नाही विषय कोणताही असो आपण चांगला अभ्यास केला रोज महाविद्यालयात आलो तर नोकरीच्या संधी आपल्यासाठी अपोआप चालत येतील असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयामार्फत नुकताच रोजगार मेळावा घेण्यात आला त्यामध्ये १०३३ उमेदवार मुलाखतीसाठी आले व त्यातील ३५० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांतर्फे ऑफर लेटर देण्यात आले याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. 
    कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या विविध पैलूंवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले. “Career Opportunities in Chemistry: From Laboratory to Industry”, “Innovations in Food Chemistry” आणि “Chemistry in Daily Life” या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील मांडणी केली. मान्यवरांनी पोस्टर प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. 
      कार्यशाळेदरम्यान पोस्टर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पोस्टर स्पर्धेतील खालील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाकडे केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून न पाहता त्यातील व्यावसायिक व रोजगाराच्या संधी समजून घेण्याची संधी मिळाली.
पोस्टर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी १) कु. अश्विनी नाईकवाडे (प्रथम वर्ष विज्ञान), २) कु. यशोदा पवार ( तृतीय वर्ष विज्ञान), ३) कु. किशोर चौधरी (द्वितीय वर्ष विज्ञान), उत्तेजनार्थ – वृषाली बोराडे (तृतीय वर्ष विज्ञान) 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र झोमण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती पी. डी. गरुड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. ए. होळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. उगले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
     “रसायनशास्त्र विषयातील ज्ञानाला कौशल्याची जोड दिल्यास विद्यार्थ्यांसमोर रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात,” असा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने