सुरगाणा l प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः गर्भवती महिला तसेच विविध आजारांच्या निदानासाठी आवश्यक असलेली सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी रुग्णांना तालुक्याबाहेर जावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत होते.
ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष भारत वाघमारे यांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्री महोदयांकडे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित स्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्यात आली असून रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाले असून लवकरच सोनोग्राफी सेवा सुरु होणार आहे.
सोनोग्राफीची सुविधा सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून विशेषतः गर्भवती महिला व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांचे शिवसेना महिला आघाडी व नगराध्यक्ष भारत वाघमारे यांनी आभार मानले आहेत. सुरगाणा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, आमदार नितीन पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चौधरी, तालुका प्रमुख हरिभाऊ भोये, नगरसेवक भगवान आहेर, सचिन आहेर, विजय कानडे, सचिन महाले, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई भोये, राधाताई वाघमारे, महिला आघाडीच्या स्वाती माळी, भारतीताई जोपळे, शबाना शेख, दिपीका आहेर, अश्विनी आहेर, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात, अर्जुन शिंदे, एकनाथ भोये, दिनेश वाघ, प्रवीण पवार, गणेश चाफळकर, तबरेज शाह, जावेद शेख, अरुण पवार, गणेश वाघ, मयूर हिरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.