महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वनारे येथे पोषण माह अंतर्गत आरोग्य व पोषण जनजागृती कार्यक्रम संपन्न

दिंडोरी l प्रतिनिधी :-वनारे येथे चाईल्ड सर्व्हायव्हल इंडिया, पर्नॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, वनारे ग्रामपंचायत आणि पळसवीर उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह निमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आणि पोषण आहाराबाबत डॉक्टर सेशनचे आयोजन करण्यात आले.
    या शिबिरात महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांना ॲनिमियाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
    अंगणवाडी केंद्रात संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी पोषण आहारावर डॉक्टर सेशन तसेच पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना दैनंदिन आहारात पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आहारामध्ये पालेभाज्या व कडधान्यांचा समावेश करण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.
    पोषण माह अंतर्गत गावात पोषण जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले. रॅलीद्वारे संतुलित आहार, पोषण आणि ॲनिमियाबाबत जनजागृती करण्यात आली.
    कार्यक्रमाला वनारे गावाचे सरपंच दिपक भाऊ नरहरी झिरवाळ, ग्रामपंचायत अधिकारी अनंत जेट्टे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी चाईल्ड सर्व्हायव्हल इंडियाचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. अमोल येवला, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण, प्रवीण बैरागी, पळसवीर उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप भालेराव, अलका भोये, अजय गवळी, पुष्पा शेवाळे, एस. पारधी, बचत गट सी.आर.पी. मंगल गांगुर्डे, आशा वर्कर हिरा गायकवाड, अंगणवाडी सेविका नलिनी भोये आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने