बोरगाव l लक्ष्मण बागुल :- सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथे विविध ठिकाणांहून विद्युत वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये श्री. शिवराम भोये यांची ३०० मीटर, विजय भोये यांची २०० मीटर, गुलाब देशमुख यांची ४०० मीटर तसेच अशोक भोये यांची १०० मीटर वायर चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
एकाच परिसरात मोठ्या प्रमाणात वायर चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या प्रकरणाची चौकशी करून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. चोरीला गेलेल्या वायरची एकूण लांबी सुमारे १ हजार मीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर वायर मधील कोपर काढून काळी केबल नदी टाकून गेले आहेत. यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे.