दिंडोरी l प्रतिनिधी: मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रानभाज्या महोत्सव २०२६–२७’ विषय ‘Exhibition & Importance of Wild Millets and Vegetables in Tribal Area’ या एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिमा पंडित वाघ आणि प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालायातील डॉ. ए. एस. मदने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक व विभागप्रमुख डॉ. डी. के. लोंढे यांनी केले. त्यांनी रानभाज्या व रानधान्यांचे पोषणमूल्य, औषधी उपयोग, जैवविविधतेतील महत्त्व तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक जीवनशैलीतील त्यांचे स्थान याबाबत माहिती दिली.प्रमुख अतिथी डॉ. ए. एस. मदने यांनी आपल्या मनोगतातून रानभाज्या व रानधान्यांचे संवर्धन करण्याची तसेच रानभाज्यांमधील व्यावसाईक संधी यांचे महत्व समजावून सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. प्रतिमा पंडित वाघ यांनी विद्यार्थ्यांनी स्थानिक जैवविविधतेचा अभ्यास करून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.
महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या व रानधान्यांचे नमुने जसे झारजूला, करांदे,तेरा फानंदा,तुतू इ. दुर्मिळ औषधी रानभाझ्या , त्यांची स्थानिक व शास्त्रीय नावे, उपयोग, पोषणमूल्य आणि औषधी महत्त्व यांची माहिती आकर्षक पद्धतीने सादर केली. प्रदर्शन व विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रानभाज्या महोत्सवातील विद्यार्थ्यांच्या सहभागाची दखल घेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्याविद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ यांनी रोखरक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले प्रथम क्रमांक ५०१ व प्रमाणपत्र – चौधरी कृष्णा, द्वितीय क्रमांक ३०१ व प्रमाणपत्र –गवळी चंद्रभागा व तृतीय क्रमांक २०१ व प्रमाणपत्र– केदारे तेजस्विनी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ क्रमांकासाठी१०१ व प्रमाणपत्र -पायल भोये यांची निवड करण्यात आली.आणि सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले .
प्र तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.ए. एस. बोरस्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जी. व्ही. पाटील यांनी केले.यावेळी उपप्राचार्य आर. आर. झोमन, आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. ए.पी. भगत,सकाळसत्र प्रमुख प्रा सोमवंशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. व वनस्पतीशास्त्र
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रा .ए. एस. बोरस्ते, सचिन भांगरे, सागर गटकळ, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.