महाराष्ट्र ट्रायबल न्युज

खोकरविहीर जिल्हा परिषद शाळेत उत्साहात दिवाळी महोत्सव साजरा

खोकरविहीर l  प्रतिनिधी :-जिल्हा परिषद शाळा, खोकरविहीर येथे दिवाळी महोत्सव उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाचा आनंद घेत शाळेतील वातावरण उत्साहाने भरून गेले.
    या कार्यक्रमास खोकरविहीर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. कैलास बहिरम साहेब, शाळेचे मुख्याध्यापक विजय राठोड सर, प्रमोद गवळी सर,नंदू डगळे सर, हेमंत जगदाळे सर, छाया भोये मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाडवी उपस्थित होते.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व सांगून आनंद, उत्साह आणि एकोप्याने सण साजरा करण्याचा संदेश दिला. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे दिवाळी महोत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.
    विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने शाळेचा दिवाळी महोत्सव अविस्मरणीय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने