नाशिक l प्रतिनिधी:- दिनांक १८-१०-२०२६ रोजी जव्हार तालुक्यातील पाणी टंचाई गाव हट्टीपाडा येथे Wells on Wheels चे संस्थापक अध्यक्ष श्री. शहाज मेनन यांच्या संकल्पनेने हट्टीपाडा गावातील ४७ कुटूंबाना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले.
हट्टीपाडा गावाला संस्थेचे नारायण गभाले यांनी भेट देऊन पाड्यावरील खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती. सर्व वस्तीला एकत्र करुन गावाची समस्या जाणून घेतल्या. गावाची पाहणी करुन गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले. ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये. पाणी आणण्या पासून यामुळे बराचसा वेळ जातो. यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकतं नाही. ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या माध्यमातून साकुर गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल. यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, संकेत धेनक, अविनाश चौधरी, मुंजा कारके तसेच गावातील सरपंच मित्तल पोटीदा उपसरपंच अभिषेक भोये, सुदाम उंबरसाडा, युवराज पोटीदा, तितेश सवरा , ज्ञानेश्वर पोदीदा हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मोठया उत्साहात कार्यक्रम पार पडला.