दिंडोरी । दि.10 प्रतिनिधी
दिंडोरी येथील अरुणोद्य सार्वजनिक वाचानालयाचा विद्यार्थी सौरभ गायकवाड याने प्रादेशिक सेनेत जवान पदाला गवसणी घातली असून शेतकरी कुटूंबातील या युवकाच्या यशामुळे त्याचे कौतुक होत आहे.
म्हेळूस्के सारख्या खेडे गावात सौरभ गायकवाड याचे प्राथमिक शिक्षण झाले. तो आता दिंडोरी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने शिक्षण करता करताच अरुणोद्य सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परिक्षाची तयारी सुरु होती. त्याने एक वर्ष म्हेळूस्के येथून ये - जा केली. शेतात आई-वडीलांना कामामध्ये मदत केली. परिक्षांल तो सामोरे गेला. त्यात त्याला यश आले. पहिल्याच प्रयत्नात केंद्र सरकारच्या प्रादेशिक सेनेत जवान म्हणून यशस्वी झाला. त्याचा अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी जिद्द चिकाटी आणि घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते, असे सौरभ गायकवाड यानी सांगिले. विद्यार्थ्यानी त्याचे कौतुक केले. आभार ग्रंथपाल सुरेखा धुळे यांनी मानले. संयोजन मनोहर पाटील यांनी केले.