maharashtratribalnews

नाशिक जिल्हा प्राथमिक एनपीएस संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन वडजे

दिंडोरी दि ९ l कृष्णा पवार
नाशिक जिल्हा प्राथमिक एनपीएस संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिंडोरी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री सचिन वडजे यांची निवडीची घोषणा मालेगाव येथे झालेल्या शिक्षक मेळाव्या प्रसंगी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी केली .

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळा मधील शिक्षकांची राज्यस्तरीय सर्वात मोठी संघटना असून या संघटनेच्या डीसीपीएस एनपीएस धारक शिक्षकांची युवा आघाडी स्थापन करण्यात आलेली असून या एनपीएस संघाची कार्यकारिणी मालेगाव येथे झालेल्या शिक्षक संघाच्या मेळाव्या प्रसंगी घोषित करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते .
श्री सचिन वडजे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा झाल्यानंतर शिक्षक संघाचे नूतन राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवराज पवार राज्य उपाध्यक्ष मिलिंद गांगुर्डे , जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे आदींनी श्री सचिन वडजे यांचा सत्कार करून अभिनंदन केले .
श्री सचिन वडजे यांनी निवडीनंतर सांगितले की जिल्ह्यातील एन पी एस धारक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवू तसेच जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी लढा बळकट करू व जिल्ह्यात संघटनेची मजबूत बांधणी करू असे सांगितले .

वडजे यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे तसेच दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवडीचे उस्पर्त स्वागत केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने