maharashtratribalnews

१४ दिवस मुख्याध्यापकास न्यायालयीन कोठडी जिल्हा न्यायाधीशांचा आदेश



प्रतिनिधी |बोरगाव
सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील दोन महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याने त्याच्यावर बाहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला शनिवारी (दि. ८) नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
आश्रमशाळेतील दवाखान्याच्या रुममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने झटापट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनीही मुख्याध्यापक बच्छाव यांना समजावून सांगितले होते. मात्र, मुख्याध्यापक पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल, इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचे कागदोपत्री दाखवेल अशी धमकी देत हा प्रकार वारंवार केला. यास कंटाळून संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. ५) बाहे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे मुख्याध्यापक बच्छाव याच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ६ मार्चला नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. शनिवारी (दि. ८) नाशिक न्यायालयात पुन्हा हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बाहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने